
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
सर्वोच्च लोकशाहीतल्या कायद्यासारख्या श्रेष्ठ दस्तऐवजाच्या अंमलबजावणीचं काम मनात धरून आम्ही संघर्ष करीत होतो; परंतु आम्हाला नक्षलवादी ठरवण्यापर्यंत, आमच्यावर प्राणघातक हल्ले होईपर्यंत तो पसारा अन् गुंतागुंत वाढत जाईल, असं वाटलं नव्हतं. एका कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी आम्हाला ‘नक्षलवादी’ ठरवण्यापर्यंत नेईल, याचा आम्ही विचारही केला नव्हता. आमचा गुन्हा एकच की ‘बंधबिगार मुक्तीच्या कायद्याची’ आम्ही अंमलबजावणी मागत होतो आणि ती करणं हे ज्यांचं कर्तव्य होतं ती प्रशासकीय व्यवस्था मात्र आम्हाला गुन्हेगार ठरवत होती...