डॉ. मनीष दाभाडे, सहयोगी प्राध्यापक, जेएनयू
अमेरिकेमध्ये महामंदीचा काळ असताना, १९३३मध्ये अध्यक्षपदावर फ्रँकलिन डी. रुझवेल्ट आले. त्यांनी सूत्रे स्वीकारताच तडकाफडकी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या या सुरुवातीच्या कारभाराला अमेरिकी माध्यमांनी ‘पहिले १०० दिवस’ असे नामकरण केले होते. आता रुझवेल्ट यांच्या पहिल्यांदा अध्यक्ष होण्याच्या काळाला ९० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, तरीही कोणत्याही नव्या अध्यक्षाने सूत्रे स्वीकारल्यानंतर १०० दिवसांमधील निर्णयांकडेच सर्वांचे लक्ष असते.