

Donald Trump
sakal
श्रीराम पवार- shriram1.pawar@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं शांततेसाठी नोबेल मिळण्याचं स्वप्न निदान यंदा तरी भंगलं. त्यांना आणि त्यांच्या भक्तगणांना ज्यासाठी ट्रम्प या सन्मानास पात्र आहेत असं वाटत होतं, त्यातील पश्चिम आशियातील इस्राईल-हमास संघर्षाला अर्धविराम तरी देण्यात ट्रम्पनीतीला यश आलं आहे, तेच सूत्र वापरून युक्रेन युद्ध थांबवण्याचे ट्रम्प यांचे ताजे प्रयत्न मात्र अपयशी ठरले. शांतिदूत अध्यक्ष बनण्याच्या स्वप्नापायी युद्धं थांबवण्याचा चाललेला अट्टाहास असो, की व्यापारातील अटी-शर्ती आपल्याच लाभाच्या असल्या पाहिजेत, यासाठीचं दबावतंत्र. ट्रम्प यांच्या पॅटर्नला जिथं अमेरिकेचं निर्विवाद वर्चस्व आहे, तिथं यश मिळतं तर जिथं ‘अरे ला कारे’ करण्याची क्षमता दाखवली जाते, तिथं या पॅटर्नच्या मर्यादा स्पष्ट होतात.