
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपर्यतच्या पश्चिम आशियातील भूराजकीय रचनेत इस्रायलकेंद्री धोरणापासून अमेरिका बाजूला जाते आहे याचे दाखले दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार हेच यापुढच्या काळात अमेरिकेच्या दृष्टीने महत्वाचे असतील हे त्यांनी आखाती देशातल्या दौऱ्यात स्पष्ट केलंय. ट्रम्प यांनी मोठा गुंतवणूक आणल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. एकूण अमेरिकेतले हे नवे वळण आ३हे हे नक्की...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसांत पश्चिम आशियातील तीन देशांना दिलेल्या भेटीतून या भागातील भूराजकीय रचनेला नवं वळण मिळण्याच्या शक्यता तयार झाल्या. अमेरिकेचा पश्चिम आशियात इस्रायलला संपूर्ण पाठिंबा आणि तेथील तेल उत्पादक अरब देशांमध्ये असलेल्या राजेशाहीसोबतत सौहार्दाचे संबंध असं एक संतुलन सातत्यानं राखलं जातं आहे.