US Military
Esakal
डॉ. मनीष दाभाडे
अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला थेट अमेरिकेच्या ‘सांस्कृतिक युद्धां’मध्ये ओढले. त्यांचे व्हर्जिनियातील राजकीय भाषण विविधवंशीय राहात असलेल्या शहरांना कायद्याचा अंमल नसलेली शहरे ठरवते. अशा शहरांमध्ये सैन्याला प्रशिक्षण देण्याचे आवाहन करणे म्हणजे सैनिकांना आपल्याच नागरिकांविरुद्ध उभे करणे.
व्हर्जिनियामध्ये ३० सप्टेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी सैन्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आणि एका लोकशाहीतील जबाबदार नेत्याने कधीच करू नये, असे विधान त्यांनी केले. त्यांनी जाहीरपणे म्हटले, “आपल्या काही ‘धोकादायक शहरां’चा वापर आपण सैन्याच्या प्रशिक्षणासाठी करायला हवा.” क्षणभर हे विधान फक्त ट्रम्पच्या नेहमीच्या शैलीतील- भडक, सनसनाटी आणि मथळ्यांसाठी तयार केलेले- असे वाटले.