
US tariffs on medicines India
esakal
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषधउद्योगांवर आयातशुल्कवाढीचा बडगा उगारला आहे. त्याची झळ भारताला बसणार असली तरी त्यावर उपाय आहेत. पंतप्रधानांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे सूत्र भारतीय जनतेला दिलेले आहे. त्याआधारे आपण देशांतर्गत मागणीच्या बळावर या आव्हानाला तोंड द्यायला हवे.
अ मेरिकेमध्ये आयात होणाऱ्या ब्रँडेड औषधांवर आणि पेटेंटेड औषधांवर १०० टक्के आयातशुल्क आकारण्यात येणार आहे. हा निर्णय आजपासून (ता.एक ऑक्टोबर) अमलात आला आहे. याची काही प्रमाणात झळ भारताला बसेल. ट्रम्प व त्यांच्या सल्लागारांना याची कल्पना आहे.