
मागच्या ३ महिन्यात भारताची एकूण निर्यात ज्या वेगाने चालली आहे, तशीच निर्यात इथून पुढे चालू राहिली, तर भारत नक्कीच आत्तापर्यंतच्या निर्यातीचे सर्व विक्रम मोडेल. भारताने २०२४–२५ या आर्थिक वर्षात कृषी-निर्यात ४८.८ अब्ज डॉलर्सवरून ५१.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवली आहे. म्हणजेच यात ६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय कृषी-निर्यातीला इतका वेग येण्याची कारणे काय असतील? आता वर्तमानातील कृषी-निर्यातीची अवस्था कशी आहे?
भारताची कृषी निर्यात सध्या इतकी मजबूत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले ५०% टॅरिफ धोरण मोठा धोका निर्माण करू शकते! या टॅरिफमुळे भारत समोर कोणती आव्हाने उभी राहू शकतात? या आणि अशा अनेक मुद्द्यांविषयी जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून!
या वर्षभरात आत्तापर्यंत भारताच्या कृषी निर्यातीची अवस्था अत्यंत सकारात्मक राहिली आहे. इतर सर्व क्षेत्रांतील एकंदर वस्तू निर्यात स्थिर राहिली असताना, कृषी क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२४–२५ या आर्थिक वर्षात भारताची कृषी-निर्यात ४८.८ अब्ज डॉलर्सवरून ५१.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच यात ६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही, तर चालू आर्थिक वर्षाच्या (२०२५–२६) पहिल्या तीन महिन्यांतही ही निर्यात ५.८ टक्क्यांनी वाढली आहे. जर हीच वाढ कायम राहिली, तर २०२५–२६ मध्ये कृषी-निर्यात ५५ अब्ज डॉलर्सच्या आसपास पोहोचू शकते. जर असे झाले, तर २०२२–२३ मधील ५३.२ अब्ज डॉलर्सचा विक्रम या वर्षी मोडेल. त्यामुळे सध्यातरी भारताची कृषी निर्यात अत्यंत सक्षम अवस्थेत आहे.