Premium| Trump nuclear test decision: डोनाल्ड ट्रम्प यांचा अणुचाचण्यांचा निर्णय, अमेरिकेच्या आत्मविश्‍वासावर प्रश्नचिन्ह

US nuclear weapons policy: ट्रम्प यांचा अण्वस्त्रांवरील भर विज्ञान, सायबर आणि अवकाशीय प्रगतीपेक्षा वेगळा मार्ग दाखवतो. या निर्णयाने अमेरिका आणि जग दोन्ही अनिश्चिततेकडे वाटचाल करत आहेत
Trump nuclear test decision

Trump nuclear test decision

esakal

Updated on

जगातील सर्वांत बलाढ्य देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ ‘इतर काही देश करताहेत म्हणून’ अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करणे ही निश्‍चितच एक विसंगती. या निर्णयामुळे जगाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा ठेका घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या अमेरिकेच्या आत्मविश्‍वासाला कमीपणा येत नाही का? की पुतीन आणि शी जिनपिंग यांसारख्या नेत्यांना ट्रम्प त्यांच्या मोठेपणाचे काही देणे-घेणे नाही आणि ते आपल्याच मनाप्रमाणे वागणार, याचा साक्षात्कार ट्रम्प यांना झाला आहे? कदाचित अमेरिकेच्या ‘जागतिक नेतृत्वा’ची झळाळी वेगाने कमी होत असल्याचे ट्रम्प यांना कळले असावे...

आपल्या पूर्वसुरींच्या शास्त्रीय व राजनैतिक प्रयत्नांनी काही दशकांच्या काळात आकारास आलेली ‘जागतिक अण्वस्त्र नियंत्रण व नि:शस्त्रीकरणा’ची चौकट डोनाल्ड ट्रम्प यांना आज मोडायची आहे. अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करू करणे, हे अमेरिकेस आपल्या तंत्रज्ञानात्मक व धोरणात्मक वरचढपणाबाबत खात्री नसल्याचे लक्षण आहे का? जागतिक सत्तेचे पारडे आता अमेरिकेच्या दिशेस झुकत नाही का? कदाचित या सर्व गोष्टींची चिंता भेडसावत असल्यामुळेच ट्रम्प यांनी अण्वस्त्रमार्गाचा वापर करायचे ठरवले असावे. आयात शुल्काच्या साधनाचा दीर्घकालीन आर्थिक वर्चस्वाच्या दृष्टीने उपयोग होणार नाही हे त्यांना समजले असावे. एके काळी अमेरिकेच्या प्राबल्याचे चिन्ह असलेले, शस्त्रास्त्रांच्या चढाओढीचे ‘शीतयुद्ध प्रारूप’ परत आणण्याचा मानस त्यासाठीच असावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com