Trump nuclear testing announcement
esakal
Premium|Trump nuclear testing announcement : ट्रम्प यांच्या घोषणेमुळे पुन्हा अणुचाचण्यांचे संकट
डॉ. मनीष दाभाडे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अणुचाचण्या घेण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने अणुचाचण्यांना सुरुवात केली, तर अन्य देशही चाचण्या घेतील आणि पुन्हा अण्वस्त्रस्पर्धेला सुरुवात होण्याची भीती आहे. यातून जग अस्थैर्याच्या खाईत ढकलले जाऊ शकते.
अमेरिका पुन्हा अणुचाचण्या सुरू करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिली. अमेरिकेने ३३ वर्षांपूर्वी अणुचाचण्या घेण्याचे थांबविले होते आणि त्यामुळे जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धेवर नियंत्रण आले होते. ट्रम्प यांनी हाच निर्णय बाजूला ठेवल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ‘अन्य देशांच्या अणुचाचण्यांच्या कार्यक्रमामुळे समकक्ष पातळीवर समकक्ष पातळीवर अणुचाचण्या सुरू करण्यात याव्यात, असे आदेश युद्ध खात्याला दिले आहेत,’ असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियामध्ये भेट झाली, त्यापूर्वीच ट्रम्प यांनी वरील घोषणा केली. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसमध्ये विषय मांडला नाही किंवा सहयोगी देशांबरोबर औपचारिक चर्चाही केली नाही. या घोषणेमुळे अमेरिकेचे काही दशकांपासूनचे धोरण बाजूला पडले आणि जग नव्या आण्विक स्पर्धेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

