नवी दिल्ली: युनायटेड स्टेट्सचे ४७ वे अध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी, डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे अनेक निर्णय पलटवून लावत अनेक नव्या निर्णयांवर सही केली. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी साधारण ८० आदेशांवर सह्या केल्या. त्यातील चार महत्वाचे निर्णय आहेत जे जागतिक दृष्टिकोनातून देखील महत्वाचे आहेत.
वॉशिंग्टनच्या कॅपिटल वन एरिनामध्ये अध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर आणि उद्घाटनपर भाषण दिल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी आपला पहिला आदेश जारी केला. या आदेशानुसार आता अमेरिकेतील सर्व सरकारी आणि सरकारशी संबंधित संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी आता वर्क फ्रॉम होम न घेता पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहून काम करणे आवश्यक आहे.
त्यांनी अमेरिकेत जन्माला येणाऱ्या व्यक्तीपासून ते घरवापसी पर्यंत आणि पारलिंगी व्यक्तीपासून ते जागतिक आरोग्यसंघटनेपर्यंतचे जगाच्या दृष्टिकोनातूनही तितकेच महत्वाचे असणारे निर्णय घेतले आहेत.
'सकाळ प्लस' च्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यांनी घेतलेल्या चार महत्वाच्या निर्णयाविषयी आणि त्यामागील कारणांविषयी..!