
निखिल श्रावगे
अमेरिकी अध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या परदेश दौऱ्यांची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला भेट देऊन नुकतीच केली. या भेटीने सूचित केलेले अल-शरा यांचे पुनर्वसन तसेच पश्चिम आशियात पुन्हा बदलत असलेल्या समीकरणाची चर्चा करणे आवश्यक ठरते. या दोऱ्याने उपस्थित केलेल्या मुद्यांचा ऊहापोह.
अमेरिकी अध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या परदेश दौऱ्यांची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला भेट देऊन नुकतीच केली. सौदीत असताना ट्रम्प यांना सीरियाचे विद्यमान अध्यक्ष अहमद अल-शरा भेटले. पूर्वाश्रमीचे दहशतवादी असलेल्या अल-शरा आणि ट्रम्प यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.