
संजय कुमार
कोणत्याही निवडणुकीमध्ये ‘एक्झिट पोल’विषयी उत्सुकता असते. अनेक वेळा ‘एक्झिट पोल’चे अंदाज चुकीचे ठरतात, त्यावेळी कार्यपद्धतीबरोबरच विश्वासार्हतेवरही शंका उपस्थित होता. एकूणच, या सर्वेक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या बहुतांश कंपन्या एखाद्या पाहणीपुरत्या समोर आलेल्या असतात. त्यांच्याविषयी माहिती घेतली असता, त्यांचे अस्तित्वच संशयाच्या भोवऱ्यातील असते.