

दारात तुळस असणं, अनेक भारतीय घरांत दिसतं.
Holy Basil – The Spiritual, Medicinal and Industrial Wonder of India
डॉ. अनिल लचके
कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या विवाहाची तयारी सुरु होते. ‘तुलसी विवाह’ संपन्न झाल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनंतर दीपावलीच्या उत्सवाची सांगता झाली, असं समजलं जातं. भारतातील घरांपुढे तुळशीवृंदावन असणे, ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. घर छोटेसे असले, तरी तिथे पत्र्याच्या डब्यात तुळशीचे एखादे रोपटे डौलदारपणे उभे असते. तुळशीचे धार्मिक महत्त्व बरेच आहे. तीर्थपात्रात तरंगणारे तुळशीचे एखादे पानसुद्धा त्या तीर्थाचे पावित्र्य बहुगुणित करते! तुळशीच्या वनस्पतीमार्फत भरपूर ऑक्सिजन बाहेर पडतो, असं म्हणतात. आपल्याला धार्मिक-पौराणिक दृष्टीने ‘तुळशी-माहात्म्या’ची ओळख आहे. आता तुळशीमधील उपयुक्त तेलामुळे आणि पानांमधील रसायनांमुळे तुळशीचे आंतरराष्ट्रीय आर्थिक-माहात्म्य देखील लक्षात आलंय.