
युगांक गोयल, कृती भार्गव
कृषी क्षेत्रासंबंधीचा नवा सांख्यिकीय अहवाल या क्षेत्रातील मूक क्रांतीची कहाणी मांडतो. यात नवे घटक, नवे उत्पादन प्रकार आणि नवी आव्हाने दिसतात. हा अहवाल संबंधित धोरणकर्त्यांनी बारकाईने वाचणे अन् अभ्यासणे अत्यावश्यक आहे.
कारण उद्याची शेतीची वाटचाल ही केवळ आपण किती उत्पादन करतो यावर अवलंबून नसेल तर आपण ती कितपत व्यवहार्य पद्धतीने, शहाणपणाने, शाश्वत पद्धतीने आणि न्याय्य पद्धतीने करतो यावर निश्चित होणार आहे.