

Types Of Resorts
esakal
कामाच्या व्यापात, शहरातील गोंगाटात आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला हरवून बसतो. अशावेळी शहराच्या धकाधकीतून थोडे बाहेर पडून एखाद्या रिसॉर्टला भेट द्यायची इच्छा होते. माझ्या भटकंतीत विविध प्रकारच्या रिसॉर्टवर राहणे झाले व त्या अनुभवाने मला जाणवले, की रिसॉर्ट म्हणजे फक्त सुट्टी नाही, तर मनाला नव्याने ऊर्जा देणारा अनुभव असतो.
रिसॉर्ट्स हॉटेलपेक्षा अधिक समृद्ध, नैसर्गिक आणि अनुभवप्रधान असतात. तिथे सुट्टीतील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी करण्यासाठी अनेक उपक्रम, सुविधा आणि मनोरंजनाची साधने असतात. स्थान, वातावरण आणि उद्देश ह्यानुसार रिसॉर्टचे स्वरूप बदलते. हिल रिसॉर्ट, जंगल रिसॉर्ट, वाळवंटातील रिसॉर्ट, वेलनेस रिसॉर्ट, गोल्फ रिसॉर्ट, लेक रिसॉर्ट, बीच रिसॉर्ट, आयलंड रिसॉर्ट व प्लांटेशन रिसॉर्ट हे काही रिसॉर्टचे प्रकार आहेत. ह्या सर्व प्रकारच्या रिसॉर्टचे उद्देश व स्थळ वेगवेगळे असले, तरी निसर्गाचा अनुभव घेणे हा मात्र सर्वांतील समान धागा असतो.