
सध्याचा जमाना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे; पण त्याचा अर्थ असा नाही, की आहे आपल्या सजीव मेंदूचा वापरच करायचा नाही. आपली पत काय अन् आपण करतोय काय, याचा पायपोस उदितजींसारख्या ६९ वर्षांच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाला नसेल तर आजच्या तरुणाईसमोर आदर्श तो काय राहील?
प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांनी नुकत्याच एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केलेल्या लज्जास्पद हरकतीमुळे एकच ‘चुंबनकल्लोळ’ उडाला. उदितजींनी निदान वयाचं तरी भान राखायला हवं होतं, असं म्हणत ट्रोलर्सनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं; पण संबंधित तरुणीला मात्र क्लीनचिट दिली. बघायला गेलं तर टाळी दोन्ही हातांनी वाजते,
असं म्हणतात; पण एखाद्याला टाळी देतानाही आजकाल दहा वेळा विचार करायला लागतो. नाहीतर एक आगळीक होत्याचं नव्हतं करते, म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ‘आयुष्य तालात जगा, बेताल तर माकडंही होतात...’