
या पूर्वी प्राध्यापक होण्यासाठी यूजीसी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. त्यामुळे एखाद्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीला प्राध्यापक म्हणून काम करायचं असेल तर या परीक्षा पास होणे गरजेचे होते. आता मात्र प्रत्येक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना प्राध्यापक व्हायचं असेल तर या परिक्षा पास व्हायची अट नाही.
नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनुसार सहाय्यक प्राध्यापक ही शैक्षणिक स्तर १० ची पोस्ट आहे. त्याला प्रवेश स्तर (एंट्री लेवल) असं सुध्दा म्हणतात. पूर्वीप्रमाणे तुमचं पदवीचं शिक्षण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी पूर्ण झालं असेल आणि तुम्ही नेट किंवा सेट परीक्षा पास असाल तर तुम्ही प्राध्यापक होऊ शकता.