मुंबई: मानवाच्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाआधी हजारो वर्ष पृथ्वीवर डायनोसॉरचे अस्तित्व होते हे आपण अनेकदा ऐकले. याचे पुरावे देखील सापडले आहे. मात्र नुकताच एक नवा शोध लागला असून यामध्ये युकेमधील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या डायनासोर ट्रॅकवे साइटचा शोध लागला आहे.
यूकेमधील ऑक्सफर्डशायरमधील डेव्हर्स फार्म क्वेरीमध्ये खाणकाम करताना हा शोध लागला आहे. या संशोधनात डायनॉसॉरच्या पाऊलखुणा दोन प्रकारच्या चक्क साडेसोळा कोटी वर्ष (166 million) जुन्या पाऊलखुणा सापडल्या आहेत.
नेमकं शास्त्रज्ञांना काय सापडलं.? या सापडलेल्या पाऊलखुणा कोणत्या प्रकारच्या डायनासॉरच्या आहेत? हे डायनोसॉर शाकाहारी की मांसाहारी? या संशोधनातून पुढे शास्त्रज्ञांना कोणता शोध लावणे शक्य होणार आहे? या सगळ्याची माहिती जाणून घेऊया.