
Credit score myths
esakal
तुम्हाला माहित आहे का, भारतातील जवळपास ४० टक्के लोकांकडे स्वतःचा क्रेडिट इतिहासच नाहीये! म्हणजेच, बँक किंवा वित्तीय संस्था त्यांना “थिन फाइल” ग्राहक म्हणतात, आणि त्यामुळे पहिल्यांदा कर्ज घेताना त्यांना जास्त व्याजदर भरावा लागतो! आजच्या डिजिटल काळात, क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासाहार्यतेचा आरसा बनला आहे. त्यामुळे प्रत्येकाला क्रेडीट स्कोरचं योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे.
पण, अजूनही लोकांच्या मनात क्रेडीटस्कोरसंबंधी अनेक गैरसमज आहेत. जसं की,
वारंवार क्रेडिट स्कोअर तपासल्याने तो कमी होतो.
अनेक कर्ज घेतल्याने स्कोअर वाढतो.
कर्जच न घेतल्याने स्कोअर उत्तम राहतो.
प्रीपेड कार्ड वापरल्याने स्कोअर तयार होतो.
अशा प्रकारचे गैरसमज तुम्हाला अडचणीत आणू शकतात त्यामुळे तुमचा क्रेडीटस्कोर सुधारण्याऐवजी बिघडू शकतो. त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळायला अडचण येईल किंवा इतरांपेक्षा जास्त व्याज भरावं लागेल. मनीकंट्रोलचा अहवालच सांतो, कमी स्कोअर असणाऱ्यांचे कर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत आहे.
पैसाबझारच्या एका अभ्यासानुसार, भारतात सुमारे ३५ टक्के लोकांचा स्कोअर फक्त हप्ते उशिरा भरल्यामुळे सहा महिन्यांत ५०–१०० गुणांनी घसरतो. त्याचबरोबर, LoanTap चा अहवाल सांगतो, ज्यालोकांनी जुनी खाती सक्रिय ठेवली आहेत त्यांचा स्कोअर सरासरी ७५० पेक्षा जास्त आहे. म्हणजेच जुनी खाती बंद केल्याने क्रेडीटस्कोर चांगला होतो या धारणेला छेद बसतो.
चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात,
क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय?
तो कसा ठरतो आणि कोणत्या गोष्टींनी तो वाढतो किंवा घटतो?
लोकांमध्ये पसरलेले ७ पेक्षा अधिक क्रेडिट गैरसमज आणि त्यामागचं सत्य!
तसेच, तुमचा स्कोअर सुधारण्यासाठी कोणत्या सोप्या आणि जबाबदार सवयी अंगीकाराव्यात.