
मला नाही वाटलं त्याच्याशी बोलावसं. भीती वाटली. असा कसा करू ब्रेक अप? वाईट वाटेल त्याला, पण मला त्याच्याबद्दल काहीच वाटतच नाहीये. कसं सांगू? नकोच सांगायला… कळेल त्याचं त्याला. तोच करेल स्वतःहून ब्रेक अप. करेल ना?
तुम्हाला कधी रिलेशनशिप मध्ये असताना तुमचा पार्टनर तुम्हाला अचानक खूप इग्नोर करतोय असं जाणवलंय का? “खूप कामात अडकलोय”, “आज नको, नंतर भेटू” असे शब्द खूप वारंवार कानावर पडतात का? किंवा समोरचा व्यक्ती नीट कम्युनिकेट करत नाहीये असं वाटलंय का? या वागण्याला ‘सॉफ्ट डंपिंग’ म्हणतात. काय आहे हे सॉफ्ट डंपिंग प्रकरण? ब्रेक अप करण्याची ही नव्या काळातली पद्धत नेमकी काय आहे? जाणून घेऊ ‘सकाळ प्लस’ च्या या विशेष लेखातून…