
Universal Basic Income
esakal
डॉ. रवींद्र उटगीकर
तंत्रज्ञान कंपन्यांतील अलीकडेच जाहीर केलेल्या रोजगारकपातीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता उदरनिर्वाहाच्या संधींच्या मुळाशी येत असल्याची चर्चा होत आहे. या प्रश्नावर किमान सार्वत्रिक उत्पन्न (युनिव्हर्सल बेसिक इन्कम – यूबीआय) हा इलाज ठरू शकतो, असे सुचवले जात आहे. या योजनविषयी...
जनतेच्या प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांच्या आनुषंगिक जनकल्याणाचे विषय काळानुरूप बदलत राहतात. तुम्ही ज्या देशाचे नागरिक, तो सामाजिक-आर्थिक विकासाच्या कोणत्या वळणावर आहे, यानुसार त्या देशाचा जनकल्याणाचे उपक्रम राबवण्याचा प्राधान्यक्रम बदलत राहतो. याच उतरंडीत आपण व्यक्तिशः कोणत्या स्थानावर, त्यानुसार त्या उपक्रमांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ठरत असतो...