Premium|UPI MDR Charges : यूपीआयवर नवा शुल्कनियम; ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार का?

UPI MDR Rules Explained : यूपीआयच्या निवडक व्यापारी व्यवहारांवर १५ ऑक्टोबर २०२६पासून एमडीआर लागू होणार आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार मोफत राहणार असल्याने शुल्काबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
UPI MDR Rules Explained

UPI MDR Rules Explained

esakal

Updated on

ओंकार कामत - sakal.avtaran@gmail.com

भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीचा कणा बनलेल्या यूपीआय (युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस) संदर्भात एक महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने १५ ऑक्टोबर २०२६ पासून निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये शुल्काबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत.

यूपीआय म्हणजे काय?

यूपीआय ही भारतातील त्वरित डिजिटल पेमेंट प्रणाली असून तिचे संचालन ‘एनपीसीआय’ करते. २०१६ मध्ये सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांतच यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. आज किराणा दुकानांपासून मोठमोठ्या मॉलपर्यंत, रिक्षापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत आणि व्यक्ती-ते-व्यक्ती पैशांच्या देवाणघेवाणीपासून विविध सेवांच्या बिलांच्या भरण्यापर्यंत यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ऑगस्ट २०२६ मध्ये यूपीआयद्वारे तब्बल २४.५१ अब्ज व्यवहार झाले. त्यामुळे यूपीआय ही केवळ पेमेंटची सुविधा न राहता भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची पायाभूत व्यवस्था बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com