
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
विकासाच्या योजना आखून पुरेसे नाही तर तळागाळापर्यंत त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी गरज असते ती कार्यक्षम प्रशासकीय सेवेची.
यूपीएससीच्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. यातून हजार-बाराशे अधिकारी अंतिमतः निवडले जातात. यावरून या परीक्षेच्या काठिण्य पातळीचा अंदाज येऊ शकतो. मराठी टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवरही बरेच प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षेची पद्धती, अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी करण्याचे तंत्र, याबाबतचे गैरसमज यांविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरते.