
UPSC exam success trends
esakal
युगांक गोयल, कृती भार्गव
संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सनदी नागरी सेवा परीक्षांसदर्भातील अहवाल या प्रक्रियेत किती कठीण अन् किती तीव्र स्पर्धा आहे, याचे चित्र प्रभावीपणे उभे करतात. या अहवालांद्वारे या परीक्षांचे नेमके स्वरूप, त्यातील तीव्र स्पर्धा नीट समजावून घेणे, हे भावी इच्छुकांसाठी अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळेच या उमेदवारांना त्यांच्यासमोरील आव्हाने, मर्यादित संधींची माहिती अन् मार्गदर्शक नकाशाही (रोडमॅप) समजण्यास मदत होईल...
संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) सनदी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी यात सहभागी होतात. प्रस्तुत विषयावरील लेखाच्या या भाग २ मध्ये २०१६ ते २०२२ या कालावधीतील (६९ ते ७३ वा वार्षिक अहवाल) प्राथमिक, मुख्य आणि अंतिम शिफारस टप्प्यांचा अभ्यास करून विषय. प्रवृत्ती, यशाचे प्रमाण, समाजघटकांचे प्रतिनिधित्व, वय-लिंग नोंदी तसेच प्रयत्नांच्या आधारे उमेदवारांना मिळालेल्या यशाचा मागोवा घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि यश मिळवण्याच्या मार्गातील गुंतागुंत दाखवून देणे हा उद्देश आहे.