

Iran internal unrest impact on India economy
esakal
आखातातील प्रमुख इस्लामिक देश अशी ओळख असणाऱ्या इराणमध्ये सध्या अंतर्गत उठावामुळे जटिल संकट उद् भवले आहे. तेथील संघर्षकर्त्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा जाहीर केला असून लवकरच अमेरिका इराणमध्ये लष्करी हस्तक्षेप करेल, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून वस्तू व सेवांची आयात करणाऱ्या देशांवर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क (टेरिफ) आकारण्याची घोषणा केली आहे. यामुळे एकीकडे आखातातील असुरक्षितता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे येणारा आर्थिक बोजा अशा दुहेरी संकटाचा सामना भारताला करावा लागत आहे.