Premium|Study Room : अमेरिका-इराण शांतता करार; पश्चिम आशियातील शांततेच्या दृष्टीने  महत्त्वाचे पाऊल!

US-Iran Peace Agreement : अमेरिका-इराण शांतता कराराची पार्श्वभूमी, १९७९ पासूनचा संघर्ष, अणुकरार, पश्चिम आशियातील तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व आणि जागतिक शांतता व अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम समजून घ्या.
US-Iran Peace Agreement

US-Iran Peace Agreement

esakal

Updated on

लेखक : महेश शिंदे

अमेरिका-इराण शांतता करारामुळे पश्चिम आशियात आणि जगभरात आशावाद निर्माण झाला आहे. अनेक वर्षांच्या अविश्वास, निर्बंध आणि संघर्षानंतर हा करार युद्धाऐवजी राजनैतिक संवादाची संधी देत आहे. वाढता प्रादेशिक तणाव, व्यापारी मार्गांवरील धोके आणि ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा करार जागतिक शांतता, सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

संघर्षाची पार्श्वभूमी

अमेरिका–इराण संघर्षाची मुळे १९७९ च्या इराणी क्रांतीमध्ये आहेत. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांकडे कायम संशयाच्या नजरेने पाहिले आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, इराण पश्चिम आशियातील सशस्त्र गटांना पाठिंबा देतो, प्रादेशिक स्थैर्याला बाधा आणतो आणि लष्करी उद्देश असू शकणारा अणुकार्यक्रम विकसित करतो. दुसरीकडे, इराणचा आरोप आहे की अमेरिका त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करते, आर्थिक निर्बंध लादते, लष्करी दबाव निर्माण करते आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी देशांना पाठिंबा देते.

गेल्या अनेक वर्षांत तणाव कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु परस्परांवरील विश्वासाच्या अभावामुळे ते बहुतांश अपयशी ठरले. २०१५ मधील अणुकरारामुळे आशा निर्माण झाली होती, मात्र तो मोडल्यानंतर दोन्ही देश पुन्हा संघर्षाच्या मार्गावर गेले. अलीकडच्या काळात लष्करी हल्ले, लष्करी तळांवरील कारवाया, होर्मुझ सामुद्रधुनीभोवती वाढलेला तणाव आणि लेबनॉन, इराक, सीरिया तसेच येमेनमधील अस्थिरता यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com