Premium|US Iran War Ceasefire : इराणपुढे गुडघे टेकले? ट्रम्प यांच्या ‘व्हर्साय’ करारामुळे अमेरिका शरण गेल्याचा आरोप

Donald Trump Foreign Policy : अमेरिका-इराण युद्धबंदीनंतर ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपेक्षित उद्दिष्टे साध्य न झाल्याने या कराराकडे अमेरिकेच्या रणनीतिक माघारीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
US Iran War Ceasefire

US Iran War Ceasefire

esakal

Updated on

१९१९ मध्ये जर्मनीच्या शरणागतीवर शिक्कामोर्तब करणारा व्हर्सायचा तह फ्रान्सच्या व्हर्साय पॅलेसमध्ये झाला होता, त्याच व्हर्सायच्या राजवाड्यात बसून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचे युद्ध संपवणाऱ्या सामंजस्य करारावर सही केली. इराणच्या बहुतेक मागण्यांपुढे मान तुकवावी लागली. यालाच अमेरिकी माध्यमं, तज्ज्ञ अनेक दशकांतील व्यूहात्मक घोडचूक किंवा अमेरिकेची शरणागती म्हणताहेत. हा व्हर्सायचा तह ट्रम्प यांना दीर्घकाळ छळत राहील.

चार महिन्यांनी अखेर अमेरिका आणि इस्राईलनं सुरू केलेलं इराण युद्ध थांबलं. हा जगाला दिलासा आणि अमेरिकेलाही. यासाठीच्या करारावर सही करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लौकिकास जागत जगाला आपण महामंदीपासून वाचवल्याची मोठी शेखी मिरवली. ट्रम्प यांना स्वतःची डीलमेकर अशी ओळख आवडते. त्याच्यासाठी अमेरिकेचा परराष्ट्र व्यवहार, व्यूहात्मक रणनीती हे सारं देवाणघेवाणीवर आधारलेलं डील करण्यासाठी असतं. आणि त्यात आपल्या आधीचे सारे राष्ट्राध्यक्ष नापास झाले आपणच काय ते अमेरिकेला वैभवी दिवस दाखवायला अवतरलो आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. या सगळ्या ढोंगाला इराणसारख्या अमेरिकेच्या तुलनेत अगदी अशक्त अशा देशानं दणका दिला. ट्रम्प यांच्यातील डीलमेकरला डील कसं करायचं असतं याचा जणू वस्तुपाठच इराणी राज्यकर्त्यांनी घालून दिला. हे तेच राज्यकर्ते आहेत ज्यांना घालवण्यासाठी, ज्यांच्या कचाट्यातून इराणची मुक्तता करण्यासाठी ट्रम्प यांनी युद्ध सुरू केलं होतं, त्यांच्यासोबतच शांततेसाठी वाटाघाटी करायला लागल्या. त्यात इस्लामी राजवट उलथवण्याचं स्वप्न भंगले, पण ज्याचा युद्ध सुरू करताना कसलाही संबंध नव्हता, अशा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं हा कराराचा परमोच्च बिंदू बनला.

नुकसान सहन करण्याची क्षमता

या युद्धानं अमेरिकेची जागतिक ताकद ही ओळख संपणार नाही मात्र अमेरिका काहीही करू शकते, या समजाला तडा गेला. ट्रम्प आणि त्यांचे अमेरिकी भक्त काहीही सांगत असले, तरी हे डील कोणाच्या बाजूनं झुकलं आहे हे इराणमधील आनंदोत्सव आणि अमेरिकेत ट्रम्प यांच्या पक्षाचेच नेते ही तर अमेरिकेची शरणागती, असा बोल लावत आहेत यातून दिसतं. या निदान तूर्त विराम घेतलेल्या युद्धानं ट्रम्प यांची कारकीर्द मध्यावर येत असताना त्यांच्या स्वसामर्थ्याच्या अचाट कल्पनेतील पोकळपणा पुढं आणला, बलाढ्य चीनपाठोपाठ किरकोळ इराणनं जागतिक गुंडगिरीसमोर केवळ ‘अरे ला कारे’ म्हणून उभं राहायची हिंमत पुरेशी असते. याची काहीही करून ट्रम्प यांना खूश करण्यासाठी धडपडणाऱ्या जागतिक नेत्यांना जाणीव करून दिली. तसेच पश्चिम आशियातील सामरिक समीकरणं दीर्घकाळासाठी बदलताना इराणला वगळून तिथे शांतता ठेवता येणार नाही, हे स्वच्छपणे दाखवून दिलं. बेभरवशाचे ट्रम्प पुन्हा युद्धाचा आततायीपणा जरूर करू शकतात, असा समझोता मान्य नसलेला इस्राईल तो मोडावा यासाठी काड्या करू शकतो, मात्र इराणसारख्या देशांची नुकसान सहन करण्याची क्षमता आणि अमेरिकेसह विकसित, विकसनशील देशांची आर्थिक ताण सोसण्याची मर्यादा यातून युद्धापेक्षा इराणी हेकेखोरीला वाटाघाटींमधूनच चाप लावता येऊ शकतो, हा युद्धाचा धडा. तो ट्रम्प यांच्यासारखी वाह्यात बडबड न करता युद्धाची जोखीमही न घेता बराक ओबामा यांनी गिरवला होता. त्यावर अखंड हल्लाबोल करणाऱ्या ट्रम्प यांना त्याच मार्गानं जावं लागलं. देशाचे हितसंबंध जपण्यातला कणखरपणा असणं आणि दाखवणं यातील हा फरक.

नेतान्याहू यांची महत्त्वाकांक्षा

इराणसोबतचं युद्ध इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची महत्त्वाकांक्षा आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टगेगिरी यांचा संयुक्त परिणाम होता. या युद्धातून जे घडावं असं अमेरिकेला वाटत होतं किंवा इस्राईलच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यातील काहीच हाती न लागता युद्धबंदी झाली आहे. युद्ध सुरू करताना इराणनं बिनशर्त शरण यावं, इराणमधील इस्लामी क्रांतिवाद्याची सत्ता संपवावी, इराणचा अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम कायमचा बंद करावा, इराणचे पश्चिम आशियातील साथीदार नेस्तनाबूत करावे ही उद्दिष्टे होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com