

Why Is US Debt Rising
esakal
हर्ष काबरा - saptrang@esakal.com
अमेरिकेचे कर्ज विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. डॉलर जगाचे राखीव चलन म्हणून पत राखतो, म्हणून अमेरिका स्वस्तात कर्ज उभारते. मात्र वाढते कर्ज, व्याजखर्च आणि घटता विश्वास अमेरिकेसमोर कठीण प्रश्न उपस्थित करत आहेत.
आकड्यांपुरते मर्यादित नसते. ते वर्तमान घडवण्यासाठी भविष्याकडून घेतलेली उसनवारी दर्शवते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जाने नुकताच ४० लाख कोटी डॉलरचा अभूतपूर्व टप्पा ओलांडला. हा आकडा अमेरिकेच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा जास्त आहे. हे कर्ज अमेरिकेच्या आर्थिक प्रभावामागची ताकद, तसेच त्याखाली दडलेली वित्तीय असुरक्षितता उघड करते.
अमेरिका दरवर्षी निव्वळ व्याजापोटी सुमारे १.२ लाख कोटी डॉलर खर्च करते. ही रक्कम एकूण केंद्रीय महसुलाच्या जवळजवळ १९ टक्के आहे. व्याजाचा खर्च आता तिथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी होणाऱ्या खर्चाच्या बरोबरीने येऊन ठेपला आहे. सामाजिक सुरक्षा योजनेनंतर तो सरकारचा दुसरा सर्वांत मोठा खर्च बनला आहे. अमेरिकेला इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारणे शक्य झाले तरी कसे? जगातील राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलरचे अधिराज्य या अवाढव्य कर्जबाजारीपणाला खतपाणी घालत आले आहे. परंतु वर्चस्वाचा मुकुटही शेवटी डळमळीत होतोच; आणि त्याचे पडसाद दूरवर उमटतात. अमेरिकेच्या बाबतीत ही भीती हळूहळू मूळ धरू लागली आहे.