

Usgaon Dongari
esakal
गेल्या चार दशकांत उसगाव डोंगरीचा संपूर्ण परिसर एक परिपूर्ण ‘प्रशिक्षण संकुल’ म्हणून आकार घेऊ लागलाय. गेली सुमारे चार दशकं ते माझं कायमस्वरूपी निवासस्थान आहे. व्यवस्था पोहोचत नाही तिथे तिथे ‘उसगाव डोंगरी’ हा शोषितांपुढे सबळ पर्याय गेली चार दशकं आहे. ‘जा परतुनी उडाया ठेवुनी घाव मागे’ असे म्हणत इथला प्राजक्त येणाऱ्या प्रत्येक दु:खिताचे घाव एकत्रित करून सुगंधित करतोय!
प्रशासनाने विधायक संसदला दिलेली उसगाव डोंगरीची जमीन, जी संघटनेचं केंद्र आहे, ती वसई तालुक्यातील शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्यावर आहे. तिच्या एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला पालघर आणि तिसऱ्या बाजूला वाडा हे तालुके आहेत. आताचा पालघर आणि ठाणे जिल्हा यांना मध्यवर्ती असणारी ही जागा आहे.