
Vaishnavi Hagawane Case: आपुण्यातील वैष्णवी हगवणे या २४ वर्षीय तरुणीने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं.
National Crime Record beauroच्या आकडेवारीनुसार महिलांच्या आत्महत्येमध्ये सगळ्यात मोठा वाटा कौटुंबिक हिंसा आणि हुंड्यासाठी छळ याच कारणांचा आहे. देशभरात हुंडा आणि त्यासाठी होणारा त्रास महिलांच्या जीवावर उठला आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट दिसतं. त्याबद्दलच अधिक जाणून घेऊया या विशेष लेखातून.