Premium|Saree Wearing Experience : आई-मुलीच्या आठवणींनी फुललेलं साडीप्रेम

Mother Daughter Bond : 'सकाळ' प्रकाशनच्या उपसंपादक वर्षा जोशी-आठवले यांनी त्यांची साडी नेसण्याची आवड कमी झाल्यावर, त्यांच्या मुलीने 'आई, मी यावेळी लक्ष्मीपूजनाला तुझी साडी नेसणार' असे सांगितल्याने त्यांचे साडीप्रेम कसे पुन्हा बहरले, याबद्दलचा प्रवास आणि साड्यांच्या खरेदीचा नाद कसा वाढला हे सांगितले आहे.
Saree Wearing Experience

Saree Wearing Experience

esakal

Updated on

वर्षा जोशी-आठवले

आता कुठेही खरेदीला गेलं की साड्यांकडे आपसूकच लक्ष जातं आणि बाकी खरेदी होता होता एखादी साडीही खरेदी केली जाते. जवळची एक मैत्रीण आणि मी एकमेकींना सतत मोबाईलवरून साड्या दाखवत असतो. ही आवडली, ती चांगली वाटतेय, ही नेसल्यावर कशी दिसेल अशा चर्चा सतत घडत असतात.

माझी लेक अगदी तीन-चार वर्षांची असतानाची गोष्ट. मी बाहेरून आले की माझी ओढणी घेऊन ती स्वतःभोवती गुंडाळत बसायची. कधी ओढणीसारखी अंगावर घ्यायची, तर कधी साडीसारखी नेसायची. हे सगळं अर्थातच ती आठ-नऊ वर्षांची होईपर्यंत चालू राहिलं. नंतर नंतर मी साडी नेसली, की ‘आई तुझी साडी टोचतेय, नको नेसूस’, असं पालुपद सुरू व्हायचं. काठापदराच्या अशा कितीतरी साड्या तेव्हा नेसल्याच जायच्या नाहीत. अगदी साधी साडी नेसली तरी हे टोचतंय, ते टोचतंय असं सुरू असायचं. मग माझंही साडी नेसणं कमी होत गेलं. ती मोठी झाली तशा साड्या मला परत खुणावू लागल्या. अशातच नववी की दहावीच्या दिवाळीत टी-शर्ट आणि पँटशिवाय दुसऱ्या कपड्यांकडे न बघणारी माझी लेक अचानक मला म्हणाली, ‘आई, मी यावेळी लक्ष्मीपूजनाला तुझी साडी नेसणार!’ मी उडालेच! काल-परवापर्यंत मलाही साडी नेसायला नाही म्हणणारी लेक ‘मी तुझी साडी नेसणार’ म्हणतेय! काय घडलं अचानक?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com