

Vasota Fort trek
esakal
वासोटा तथा व्याघ्रगड इतका कठीण होता, की शिवकाळात इंग्रजांनाही तेथपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. महाराजांच्या नंतर छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी वासोट्याचा उपयोग स्वराज्याच्या कामी करून घेतला.
सातारा जिल्ह्यातील ‘वासोटा’ किल्ला अर्थात व्याघ्रगड इतिहासाचा साक्षीदार आहे... अखंड प्रेरणास्रोत आहेत. शिवकाळात वासोटा किल्ल्याचा वापर स्वराज्यद्रोह्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. दुर्गम आणि अजिंक्य असा वासोटा किल्ला गिर्यारोहणासाठी अत्यंत आनंददायी, आल्हाददायक आणि उत्साहवर्धक आहे.
सह्याद्री पर्वतामधील गड-किल्ल्यांनी इतिहास घडविला. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये गड-किल्ल्यांनी मोलाची साथ दिली. लाखोंची फौज आणि कोट्यवधी रुपयांचा खजिना घेऊन महाराष्ट्रामध्ये थैमान घालणाऱ्या निजाम, सिद्दी, आदिलशहा, पोर्तुगीज आणि मोगलांना शिवाजीराजांचे स्वराज्य जिंकता आले नाही. कारण राजांनी निर्माण केलेली अभंग, अखंड प्रेरणा आणि गडकिल्ल्यांचा भक्कम आधार...