
Vice Presidential election India
esakal
सुनील चावके
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीविषयी उत्सुकता वाढली आहे. संख्याबळ जास्त असले तरीही भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला खूपच सावध राहावे लागणार आहे.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी मंगळवारी होत असलेली निवडणूक ही एकतर्फी भासत असली तरी मतांचे अंतर तोकडे असल्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष- राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गाफील राहता येणार नाही. सारे काही सुरळीत पार पडले, तर भाजप-रालोआचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सव्वाचारशेपेक्षा अधिक मते मिळवून सहज जिंकू शकतात. पण त्यासाठी मोदी सरकारला सर्व आघाड्यांवर शेवटचे मत पडेपर्यंत जागरूक राहावे लागणार आहे.