
प्रा. डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार
नागपुरातील अधिवेशन आणि ‘विदर्भाचा विकास’ हा केवळ चर्चेचा विषय झाला आहे. दर वर्षी हिवाळी अधिवेशन घेऊनही त्यात ‘अनुशेष’ या विषयावर चर्चा होत नाही. विदर्भाच्या प्रश्नासाठी होणारे अधिवेशन आता मौज-मजा-मस्तीसाठी होताना दिसून येत आहे. यामुळे विदर्भाच्या अनुशेषावर कधी चर्चा होईल, असा प्रश्न वैदर्भीय जनतेच्या मनात आहे.
नागपूर अधिवेशन आले की प्रामुख्याने चर्चा सुरू होते ती विदर्भाची, विदर्भाच्या मागासलेपणाची, अनुशेषाची(‘बॅकलॉग’ची). संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १९६० मध्ये झाली. महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रांमध्ये समान विकासाची खात्री देण्यात आली. यावर विश्वास ठेवून ‘महाविदर्भ’ हा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला.