
विलास भोंगाडे
विदर्भात नद्या आणि प्रकल्पाची संख्या मोठी आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार ८३९ मोठे, मध्यम आणि लहान प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. तर १११ प्रकल्पाचे काम अद्यापही काम अपूर्ण आहे. विदर्भ दोन भागात विभागला आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आहे. या दोन्ही भागात नद्या आणि पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, असमतोल सिंचन विकासामुळे आजही विदर्भात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हे विदर्भातील लोकांचे दुदैव आणि सरकारचे अपयश म्हणता येईल. योग्य नियोजन केले तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात विदर्भ पाण्याने परिपूर्ण होईल, यात शंका नाही.
रा ज्यातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे, तसा पाण्याचा साठाही आटत चालला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाच्या झळा जास्त जाणवत आहे. राज्यातील धरण साठ्यातही सरासरी ३० ते ४० टक्केच पाणी शिल्लक आहे.