Premium|Hungary Viktor Orban election loss : १६ वर्षांच्या एकाधिकारशाहीला पूर्णविराम; ओर्बन पराभूत, पीटर माग्येर यांचा उदय आणि लोकशाहीवाद्यांसाठी नवी आशा

Hungary Democracy Crisis : हंगेरीचे हुकूमशहा व्हिक्टर ओर्बन यांचा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला असून पीटर माग्येर यांनी सत्ता काबीज केली आहे. लोकशाही संस्थांवर नियंत्रण मिळवूनही जनतेने मतपेटीतून दिलेला हा निकाल जागतिक उदारमतवाद्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.
Hungary Viktor Orban election loss

Hungary Viktor Orban election loss

esakal

Updated on

श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com

हंगेरीत निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना जाहिराती देण्यावर बंदी आणली मात्र सरकार वाटेल तितक्या जाहिराती देऊ शकत होतं. माध्यमांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नियंत्रण हे व्हिक्टर ओर्बन यांच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यांनी सरकारी माध्यमांतून शेकडो पत्रकारांना नारळ दिला. तिथं ओर्बन समर्थकांची वर्णी लागली. माध्यमांतून विरोध करणाऱ्याचा नाना प्रकारे छळ सुरू झाला. विरोध करणारी माध्यमं ओर्बन यांच्या डवशच्या भांडवलदारांच्या ताब्यात जातील, अशी व्यवस्था केली गेली. विरोधक, न्यायालय, माध्यमं, नागरी समाज, स्वयंसेवी संस्था अशा सगळ्या ठिकाणी नियंत्रण हा ओर्बन यांच्या संकुचित लोकशाहीचा मंत्र होता.

ही कहाणी आहे हंगेरीची. एक नेता देशाचं भविष्य बदलून टाकण्याचा वायदा करतो, दोन तृतीयांश बहुमताने लोक त्याला सत्तेत बसवतात कारण एकच, लोकांना कणखर निर्णयक्षम नेता हवा असते. त्या नेत्यानं भ्रष्टाचारमुक्ती, गतिमान विकास, देशाचे सार्वभौमत्व अशी स्वप्नं दाखवलेली असतात. विजय लोकशाही मार्गानं, मतपेटीतून झालेला... साहजिकच जनमान्यता असलेला. याच जनमान्यतेचा लाभ घेत हा नेता लोकशाही संस्थांचा अवकाश आक्रसत जातो. व्यवस्थांवर नियंत्रण मिळवतो, न्यायपालिकेला दावणीला बांधू पाहतो, सार्वजनिक जीवनातून टीका हद्दपार करू पाहतो. कोणत्याही प्रकारचा मतभेद अमान्य करू लागतो तो लोकशाही मार्गानं विजयी झालेला असतो म्हणजे लोकशाही मूल्याचं वहन करणार असलाच पाहिजे, असं काही नाही, याची बोचरी जाणीव लोकशाही उदारमतवादाला उचलून धरणाऱ्या साऱ्या युरोपला देऊ लागतो. एका टप्प्यावर तो जाहीर करून टाकतो, मा‍झ्या देशात आहे ती अनुदार लोकशाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com