
प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक विठ्ठल नागनाथ काळे यांनी अभिनय कौशल्य अन् जिद्दीच्या जोरावर थेट हॉलीवूडमध्ये झेप घेतली. लघुपट असो, नाटक असो की चित्रपट, आपल्या कलाकृतीतूनही त्यांनी संवेदनशील विषय अधोरेखित केले आहेत. उत्तम सामाजिक जाण असलेले काळे आजपासून आपल्या पाक्षिक सदरातून समाजमनाचा कोलाज सादर करणार आहेत.
घुशंका करतो तुझ्या डिग्रीवर’ अशा आशयाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर मध्यंतरी दिसत होत्या. कदाचित येत्या काळात तशा पोस्ट अजून बघायला मिळतील. समाजातील एखादी कमी शिक्षण घेतलेली किंवा अक्षर ओळख नसलेली व्यक्ती जेव्हा जास्त यशस्वी होते किंवा ती शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त पैसे कमावते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत राहतात. आज बरेच रीलस्टार आहेत, यू-ट्युबर आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांनी कमी शिक्षण घेतलेलं आहे. काहींनी तर प्राथमिक शिक्षणही पूर्ण केलेलं नाही.