

Vishalgad Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, काही नव्याने बांधले, अनेक गडांची भक्कम प्रकारे पुनर्बांधणी केली... त्यांपैकीच महत्त्वाचा किल्ला म्हणजे, विशाळगड. विशाळगडाला सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास आहे. विशाळगड घनदाट जंगलात आहे. ताशीव कडे आणि सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटलेला असल्यामुळे तो अजिंक्य आहे. स्वराज्यनिर्मितीमध्ये विशाळगडाने फारच मोलाची साथ दिलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर लगेच पन्हाळा गड जिंकला. त्यानंतर लगेच विशाळगड जिंकला. खेळणा किल्ल्याचा विस्तीर्ण पसारा, त्या गडाची भव्यता आणि विशालपणा पाहून शिवाजीराजांनी त्याचे नाव विशाळगड असे ठेवले.