Premium|Tribal democracy story : ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांच्या रक्तात संविधान कसं भिनलं? आदिवासींच्या संघर्षातून उलगडलेली लोकशाहीची एक अनोखी गोष्ट

Social Advocacy and Democracy : अमेरिकेतील ॲडव्होकसी प्रशिक्षणातून समृद्ध झालेल्या विवेक पंडितांनी 'समर्थन' आणि 'मानवी हक्क अभियान' द्वारे धोरणकर्त्यांपर्यंत शोषितांचा आवाज पोहोचवला. मराठवाड्यातील जातीधारित वेठबिगारी नष्ट करण्यासाठी त्यांनी लोकशाही आणि संविधानाला संघर्षाचे हत्यार बनवले आहे.
Tribal democracy story

Tribal democracy story

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

अमेरिकेतल्या ॲडव्होकसीच्या प्रशिक्षणादरम्यान माझ्या आणि डेव्हिड कोहेन यांच्यातील चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी नव्याने माझ्यापुढे येत होत्या. धोरण तयार केलं म्हणजे ते अमलात येतं असं होत नाही; तर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आग्रह धरून ते राबवून घ्यावं लागतं. रस्त्यावरची लढाई फक्त रस्त्यावरून लढता येत नाही. धोरण बनवण्यापेक्षाही धोरणाच्या अंमलबजावणीचं काम भारतामध्ये करण्याची अधिक आवश्यकता आहे, हे मी कोहेन यांना पटवून देऊ शकलो. फारसे प्रयत्न न करतासुद्धा जनहिताची धोरणं भारतामध्ये बनवली गेली. जनहिताचे कायदे भारतामध्ये बनवले गेले. परंतु सामाजिक न्याय देणाऱ्या या सर्व कायद्यांची अंमलबजावणी झालीच नाही. कुठे झालीच तर ती नगण्य झाली, हे कोहेन यांच्या मी निदर्शनास आणून दिलं.

धोरणकर्त्यांसोबत काम करताना फक्त धोरणकर्त्यांपर्यंत आपल्याला सीमित राहून चालणार नाही. ज्यांच्यासाठी धोरणं बनवली जाताहेत त्या गरिबांना, कष्टकऱ्यांना, सामान्य माणसांना संघटित आवाज देण्याची लोकशाहीमध्ये नितांत आवश्यकता असते. ॲडव्होकसी म्हणजे फक्त लॉबिंग नाही, ॲडव्होकसी म्हणजे फक्त संशोधन नाही, ॲडव्होकसी म्हणजे फक्त विश्लेषण नाही; तर ॲडव्होकसी म्हणजे संघर्ष करणाऱ्या, प्रत्यक्षात काम करणाऱ्या संघटनांचं म्हणणं धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक संघटित प्रयत्न असतो, अशी ॲडव्होकसीची विस्तृत व्याख्या मला कोहेन यांच्यासोबत तयार करता आली आणि नंतर प्रत्यक्ष काम करताना ती अमलातही आणता आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com