Premium| Bonded Labour Liberation: वेठबिगार मुक्तीच्या कामातूनच ग्रामविकासाची नवी दिशा कशी मिळाली?

Vivek Pandit's Struggle: वेठबिगार मुक्तीसाठी केलेले कार्य देशाला पथदर्शक ठरले. याच अनुभवातून 'ग्रामीण गरिबांना संघटित करण्याची योजना' जन्माला आली.
Organizing Rural Poor Scheme

Organizing Rural Poor Scheme

esakal

Updated on

विवेक पंडित

pvivek2308@gmail.com

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी शांतपणे ऐकत होते. माझं बोलून झाल्यावर ते म्हणाले, की ‘खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले तुम्ही... आपल्याला असं देशभर करता येणार नाही का?’ त्यानंतर ‘ग्रामीण गरिबांना संघटित करण्यासाठीची योजना’ मी तयार केली, जी सहाय्यकारक ठरली. पंतप्रधानांनी आमच्या कामाची, आमच्या संघर्षाची घेतलेली दखल माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची उपलब्धी होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेनंतर आमचा आवाका जिल्ह्याच्या आणि राज्याच्या वेशी ओलांडून देशपातळीवर आला होता. या याचिकेमुळे भारत सरकारचा कामगार विभाग, कामगार कल्याण विभाग किंवा ग्रामविकास विभाग यांनी आमच्या संघर्षाची दखल घेतली. वेठबिगार पद्धतीच्या निमित्ताने दिल्लीमधील कार्यरत स्वयंसेवी संस्थांशीही आमचा संबंध आला. त्या वेळेस डॉ. लक्ष्मीधर मिश्रा हे भारताचे ज्येष्ठ सनदी अधिकारी कामगार कल्याण आणि पुनर्वसनाचे महासंचालक होते. आमचा त्यांच्याशी परिचय झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com