
डॉ. कुलदीपसिंह राजपूत
बिहारमधील मतदार फेरतपासणी मोहिमेमुळे स्थलांतरित कामगारांच्या मताधिकाराचा प्रश्न चर्चेत आला आहे. अनेक स्थलांतरितांना ना मूळ गावात, ना स्थलांतर केलेल्या ठिकाणी मतदान करता येते. या कामगारांच्या मतदानाच्या हक्क संरक्षणासाठी सक्षम यंत्रणा विकसित करणे अनिवार्य आहे.
बि हारमध्ये निवडणूक आयोगाने ''विशेष सखोल फेरतपासणी'' हा उपक्रम राबवत मतदार यादीतील नोंदींचे पुनरावलोकन व सुधारणा करण्यास सुरुवात केली. आयोगाच्या मते, गेल्या दोन दशकांमध्ये राज्यात नवीन नोंदी, नावांची वगळणी आणि विविध त्रुटी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून, त्यामुळे मतदारयाद्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.