मुंबई: ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत करोडो लोक शेअर्समध्ये आपले पैसे गुंतवतात असे शेअर मार्केटचे बादशाह वॉरेन बफेट यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 'बर्कशायर हॅथवे' च्या मुख्य कार्यकारी पदावरून निवृत्त होणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले. अमेरिकेतील ओमाहा येथे झालेल्या वार्षिक सभेत त्यांनी अचानक याची घोषणा केली. कंपनीच्या या वार्षिक सभेला ४० हजार लोक उपस्थित होते. यामध्ये अमेरिकेतील राजकारणी हिलरी क्लिंटन याही उपस्थित होत्या. या सभेत पाच तास प्रश्नोत्तरे सुरु होती..
या सभेत वॉरेन बफेट काय म्हणाले..? त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण..? त्यांनी त्यांच्या ६० वर्षाच्या कार्यकाळात कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली..? त्यांना कोणत्या गुंतवणुकीतून फायदा झाला? कोणत्या फसल्या? कशात पैसे न गुंतवणे ही त्यांची मोठी चूक ठरली..? ते त्यांच्या शेअर्सचं काय करणार आहेत..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...