
(लेखक कॅलिफोर्नियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. Twitter : @sankam)संदीप कामत
saptrang@esakal.com
दीडशे बिलियन डॉलर्सच्या संपत्तीचा मालक वॉरेन बफेट हा जगातील काही मोजक्या श्रीमंतांपैकी एक. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या माणसानं गुंतवणुकीची व्याख्याच बदलून टाकली. त्यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली, त्या कंपन्याचं भविष्य बदललंच पण त्यांची प्रतिमाही यांच्यामुळे बदलली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. पुढचा इतिहास साऱ्या जगासमोर आहे.