war iran and america
Esakal
निरंजन मार्जनी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
पश्चिम आशियाच्या राजकारणात इराण आणि अरब देशांमधील वर्चस्वासाठीचा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. आधीच अस्थिर असलेल्या पश्चिम आशिया प्रांताला आणखी अस्थिर आणि असुरक्षित करण्यात आले आहे.
अमेरिका आणि इस्राईल यांच्या सैन्यांनी संयुक्तरीत्या इराणवर अनेक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर इराणचे अनेक राजकीय नेते आणि उच्च सैन्य अधिकारी पण मारले गेले. या घटनांनी आधीच अस्थिर असलेल्या पश्चिम आशिया प्रांताला आणखी अस्थिर आणि असुरक्षित केले आहे.