पुणे : खरं तर 'अतिथी देवो भव:' हे भारताच्या पर्यटनातील ब्रीद वाक्य..! पण आता जागतिक पातळीवर भारताची तयार झालेली ही 'अतिथी देवो भव:' ची प्रतिमा पुसली जाते आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती ओढावली आहे.. कारण अमेरिकेने १६ जून २०२५ रोजी भारतासाठी लेव्हल-२ प्रवास सल्ला (Travel Advisory) जारी केला आहे. त्यात त्यांनी भारतात महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे असे सांगितले आहे.
अमेरिकेने भारताविषयी असे काय म्हंटले आहे, भारतात कोणत्या प्रकारचे आणि कोणकोणत्या ठिकाणी धोके आहेत असे अमेरिकेला वाटते आहे जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..