
सुधाकर कुलकर्णी
प्रश्न १ : ‘सिबिल स्कोअर’ म्हणजे काय व तो कशावर अवलंबून असतो?
उत्तर: ‘सिबिल’ हा एक तीन आकडी नंबर असून, तो आपण घेतलेल्या कर्जाच्या एकूण कामगिरीवर जसे, नियमित किंवा अनियमित परतफेड, तारणाचे स्वरूप, कर्जरकमेचा वापर, कर्ज खात्यावरील एकूण व्यवहार यावर अवलंबून असतो. हा तीन आकडी क्रमांक ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. हा जितका जास्त तितका आपल्या सध्याच्या खात्यावरील व्यवहार जास्त समाधानकारक समजला जातो व त्यानुसार नवे कर्ज देताना प्राधान्य दिले जाते. थोडक्यात, आपला ‘सिबिल स्कोअर’ आपण आधी घेतलेल्या कर्जाच्या इतिहासावर अवलंबून असतो.