Durgadi Fort Kalyan: कल्याण कोर्टाने निकाल दिलेला दुर्गाडी किल्ल्याचा वाद नेमका काय होता?
Durgadi Fort Kalyan Maharashtra legal battle ownership dispute solved court order heritage property
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याबाबत न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला.
तब्बल ४८ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात कोर्टाने राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला. हा वाद नेमका काय होता, कोर्टाने काय म्हटलंय हे समजून घ्या सोप्या शब्दात.
दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे?
कल्याण शहराची सांस्कृतिक ओळख मानला जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीवरून गेली कित्येक वर्ष वाद सुरू होता. मजलिस-ए- मुशायरा या ट्रस्टने दुर्गाडी किल्ला हा मुस्लिम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असल्याचा दावा केला होता आणि दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर मालकी हक्क सांगितला होता. याप्रकरणी हिंदू संघटना १९७६ पासून न्यायालयीन लढा देत होत्या.
दुर्गाडी किल्ल्यावर मशीद, इदगाह, कब्रस्तान आहे, असा दावा मुस्लिम समुदायाने केला होता तर या शिवकालीन किल्ल्यावर हिंदुचीच वहिवाट असल्याचा दावा हिंदुंनी केला होता.

