
चंद्रपूर : चंद्रपूरजवळील ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. हा तिकीट विक्री घोटाळा नेमका काय आहे, आरोपी कोण आहेत हे जाणून घेऊया...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन व रोहित व अभिषेक ठाकूर संचालक असलेल्या चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन या कंपनीत करार झाला होता.