
आजकाल कर्ज घेणं खूप सोपं झालंय. अनेक गोष्टींसाठी आपण पर्सनल लोन घेतो. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की, हप्ता म्हणजेच EMI वेळेवर भरणं शक्य होत नाही.
सध्याच्या काळात, विशेषतः तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये पर्सनल लोनचे हप्ते थकवण्याचं प्रमाण वाढलंय. एका अहवालानुसार, मार्च २०२५ पर्यंत ९० दिवसांपेक्षा जास्त काळ हप्ता न भरलेल्या कर्जांचं प्रमाण ३.६% पर्यंत पोहोचलंय. हा आकडा खूप मोठा आहे आणि बँकांसाठीही चिंतेची बाब आहे. त्यामुळे बँकांनीही आता कर्ज देताना जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
अशा वेळी मनात भीती येणं साहजिक आहे. काय होईल? क्रेडिट स्कोअर खराब होईल का? बँकवाले घरी येतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण 'सकाळ प्लस'च्या या लेखातून समजून घेऊयात...