

WhatsApp Web Hack
esakal
व्हॉट्सॲप वेब वापरताय? आज अनेकांच्या संगणकावर व्हॉट्सॲप वेब कायम सुरू असतं. ऑफिसचं काम असो, मित्रांशी गप्पा असोत किंवा महत्त्वाचे मेसेज, संगणकावरून व्हॉट्सॲप वापरणं सोयीचं वाटतं. पण हीच सोय तुमच्यासाठी धोकादायक सुध्दा ठरू शकते. ब्राऊझर बंद केल्यानंतरही तुमचं व्हॉट्सॲप खातं सुरू राहू शकतं. अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीला तुमचे मेसेज वाचता येण्यापासून ते तुमच्या नावाने पैशांची मागणी करण्यापर्यंत अनेक गैरप्रकार घडू शकतात.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हॉट्सॲप वेबच्या सुरक्षित वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक संगणकांचा वापर, अनोळखी लिंक, बनावट मेसेज आणि खाते हॅक झाल्यास काय करायचं, याबाबत योग्य ज्ञान असेल तर मोठ्या फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकता. म्हणूनच तुमचं व्हॉट्सॲप खरंच सुरक्षित आहे का? आणि खात्याला धोका निर्माण करणाऱ्या काही चुका तुम्हीही नकळत करत तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा